गुरुवार, 27 जुलाई 2023

तडपती रान सारे

तडपती रान सारे


तडपती रान सारे, तडपती फुल बागा

आगीसारख्या या उन्हाने जीवन उजाडला सारा //धृ//


भट्टी तापिली तापिली वर कोऱ्या आभाळाची,

सर्व प्राण्यांपक्ष्यांना लागली चाहूल प्राणाची

उन्हामुळे रान झोपी गेले शांत झाल्या पायवाटा //१//


कसे देव हे कोपले, सारे जीव लागले मरायला,

या वृधावृक्षाचे देखील पान लागली गळतीला

नष्ट होऊ लागले बागा ऱ्हास झाला निसर्गाचा //२//


आला श्रवणाचा महिना घेऊन आनंदाचा सन,

पुल्लकित झाले जीव सारे आले प्राणात प्राण

होई चहूकडे हर्षोल्हास मिळे थंडगार छाया //३//


तडपती रान सारे, तडपती फुल बागा

आगीसारख्या या उन्हाने जीवन उजाडला सारा...................









दशरथ डी ठाकरे

तडपती रान सारे

तडपती रान सारे तडपती रान सारे, तडपती फुल बागा आगीसारख्या या उन्हाने जीवन उजाडला सारा //धृ// भट्टी तापिली तापिली वर कोऱ्या आभाळाची, सर्व प्र...